‘स्त्री’मधून एक खणखणीत संदेश दिला आहे- राजकुमार राव

सहजसुंदर अभिनय आणि चटकन आपलेसे करणारे व्यक्तिमत्त्व यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या अभिनेता राजकुमार रावने अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री’ चित्रपटातील भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटात त्याने विकी या प्रेमात पडलेल्या एका शिंप्याची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात भय आणि विनोद यांचे अजब मिश्रण झाले आहे. या चित्रपटाच्या कथानकात पुरुषी वर्चस्वाचे दर्शन घडवून महिलांचा आदर करण्याचा संदेश देण्यात आला आहे.
आता या चित्रपटाचा जागतिक टीव्ही प्रीमिअर प्रदर्शित होत असल्यामुळे आनंदित झालेला राजकुमार राव म्हणाला, “‘स्त्री’ हा एक आगळा, अनोखा चित्रपट होता आणि त्याचं चित्रीकरण करताना फार मजा आली. प्रेक्षकांना भयाचे धक्के आणि हंशा सारख्याच ताकदीने अनुभवायला मिळत असल्याने या चित्रपटावर प्रेक्षक खुश होते. भय आणि विनोद हे भारतीय चित्रपटांत एकत्र पाहायला मिळत नाहीत. म्हणूनच या चित्रपटात माझा भूमिका साकारतानाचा अनुभव अगदी वैशिष्ट्यपूर्ण होता. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मी शिवण, टिपण आणि एक नवी भाषा शिकलो. या चित्रपटातून एक खणखणीत संदेशही देण्यात आला असून त्यामुळे चित्रपटाच्या कथेचं महत्त्व वाढतं. या चित्रपटाचा अनुभव थरारक होता.”
तो म्हणतो, “स्टार प्लसवर ‘स्त्री’ चित्रपटाचा जागतिक टीव्ही प्रीमिअर प्रदर्शित होत असल्याचा मला खूप आनंद होत आहे.”
प्रेक्षकांना एकाच वेळी भीती आणि हंशा यांचा अनुभव देणं ही गोष्ट अवघड असते; पण ‘स्त्री’ चित्रपटात त्याचा समतोल योग्य पध्दतीने साधला गेला असून तो कुशलतेने साध्य केला गेला आहे.
‘स्त्री’ चित्रपटाचा जागतिक टीव्ही प्रीमिअर पाहा रविवार, 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.00 वाजता फक्त ‘स्टार प्लस’वर