परिधी शर्माचं फेसटाईम अफेअर

FEATURED

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर लवकरच आई आणि मुलीच्या नात्यांवर आधारित एक गोष्ट, पतियाळा बेब्स सुरु होणार आहे ज्यामध्ये मुलगी आपल्या आईच्या इच्छांना पंख देणार आहे. हे पात्र रंगवताना, गरोदरपणाच्या रजेवरून परत आलेली परिधी एका टीनएजर मुलीच्या आईची भूमिका करणार आहे. ह्या मुलीची पात्रात अशनून कौर दिसणार आहे. पंजाबचा खराखुरा फील येण्यासाठी ह्या कार्यक्रमाचे कलाकार आणि क्रू ह्यांनी पतियाळामध्ये दहा दिवस मुक्काम केला होता.

हे शूटचं पहिलंच शेड्युल होतं आणि असं पहिल्यांदाच होत होतं की परिधीने आपल्या २ वर्षांच्या मुलाला घरी ठेवलं होतं. तोपर्यंत ती आपल्या लहान मुलाला कधीच एकटं ठेऊन आली नव्हती. पण एक व्यावसायिक ह्या नात्याने ती फक्त शूटिंगच्या मधल्या वेळात किंवा सुरु होण्याआधी/संपल्यानंतर फेसटाईमचा वापर करून आपल्या मुलाशी बोलत असे.

परिधी म्हणाली, “पंजाबमध्ये शूटिंग करण्याचा अनुभव खूपच छान होता, आमचा वेळ एकदम चांगला गेला. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे निर्मात्यांनी मला माझ्या मुलावर लक्ष ठेवण्यासाठी योग्य तेवढा वेळ दिला. एका आईच्या समस्या त्यांनी बरोबर ओळखल्या आणि त्यांनी माझं जास्तीत जास्त शूट पहिल्या सत्रांत ठेवलं जेणेकरून मी मुलाशी लवकरात लवकर बोलू शकेन आणि ह्या गोष्टीला माझ्या दृष्टीने खूप महत्व आहे.”

पतियाळा बेब्स लवकरच सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर येत आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *